

Prajakta Mali and Nitin Vaidya
Sakal
प्राजक्ता माळी-नितीन वैद्य
मनोरंजन विश्वातील या दोन कलाकारांची गोष्ट केवळ त्यांच्या यशस्वी कारकिर्दीपुरती मर्यादित नाही, तर त्यांच्या आयुष्यातील अनमोल मैत्रीचीसुद्धा आहे. विविध कला माध्यमांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अनेक यशस्वी चित्रपटांचे निर्माते नितीन प्रकाश वैद्य यांच्या मैत्रीतला विश्वास आणि स्नेह, त्यांच्या नात्याची खरी ओळख अधोरेखित करतो. त्यांच्या या मैत्रीबद्दल प्राजक्ता म्हणाली, ‘‘२०२३ मध्ये एका चित्रपटाच्या निमित्ताने आमची भेट झाली. त्यावेळेस स्क्रीप्टवर वगैरे चर्चा करताना आमच्या लक्षात आलं, की फिल्ममेकिंगकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बऱ्याच अंशी सारखा आहे, तेव्हा आपल्याला एकत्र काम करायला हवं. पुढे मी ‘फुलवंती’मध्ये व्यग्र झाल्यानं आमचं नंतर फार बोलणं नाही झालं; पण फुलवंती पाहिल्यावर मला आलेला पहिला कॉल त्यांचा होता.’