
meera joshi
esakal
मुंबईत हे धावतं शहर आहे. या शहरात अनेकजण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. मुंबईत सगळ्यांची परीक्षा घेते. पण जो इथं राहिला तो मुंबईचाच होऊन जातो. मुंबईत घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. गेल्या काही वर्षात अनेक कलाकारांनी मुंबईत घर घेण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं. आता त्या कलाकारांच्या यादीत आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलंय. नुकतंच मराठी अभिनेता गौरव मोरेनं नवीन घर घेतल्याची गुड न्यूज दिली. त्यानंतर आता आणखी एका मराठी अभिनेत्रीनंसुद्धा स्वतःचं नवं घर घेतलं आहे. 'तुझा माझा ब्रेकअप' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री मीरा जोशी हिने मुंबईत स्वतःचं घर घेतलंय.