Bhooth Bangala Movie Cast
esakal
Premier
‘भूत बंगला’मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार मिथिला पालकर; साकारणार 'ही' भूमिका
Bhooth Bangala Movie Cast : अभिनेत्री मिथिला पालकर अक्षय कुमारच्या आगामी भूत बंगला सिनेमात दिसणार आहे. जाणून घेऊया तिच्या या सिनेमातील भूमिकेविषयी.
Entertainment News : ‘भूत बंगला’ हा 2026 मधील सर्वाधिक प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे बॉलिवूडची ‘ओजी’ जोडी अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांची तब्बल 16 वर्षांनंतर होणारी दमदार पुनरागमन. Balaji Motion Picturesच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाने या जोडीच्या आयकॉनिक कॉमेडी चित्रपटांवर वाढलेल्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. त्यांच्या खास विनोदशैलीचा आणि खळखळून हसवणाऱ्या जादूचा अनुभव पुन्हा मोठ्या पडद्यावर घेण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

