

monika dabade
esakal
'ठरलं तर मग' ही लोकप्रिय मालिका घराघरात पाहिली जाते. त्यामुळेच या मालिकेतील कलाकारदेखील प्रेक्षकांचे आवडते आहेत. या मालिकेतील सायली आणि अर्जुन सोबतच अभिनेत्री मोनिका दबडे देखील प्रेक्षकांची आवडती आहे. मोनिका इंस्टवर कायम सक्रीय असते. ती नेहमीच तिचे छोटे छोटे व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोबतच ती स्वतःचं युट्यूब चॅनेलदेखील चालवते. यात ती तिच्या रोजच्या आयुष्यातील गोष्टी शेअर करत असते. अशातच आता एका मुलाखतीत मोनिकाने तिला आलेला एक अनुभव सांगितलाय.