
Marathi Entertainment News : मराठीबरोबरच बॉलिवूडमध्येही आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री म्हणजे पल्लवी जोशी. पल्लवीने निर्माती म्हणूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पल्लवीने अनेक मराठी मालिकांची निर्मिती केली. इतकंच नाही तर सारेगमप या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका म्हणून वेगळी ओळख बनवली. पण गेल्या 30 वर्षांपासून तिने मराठी सिनेमांमध्ये काम केलं नाहीये. याविषयी तिने तिची खंत व्यक्त केली.