

prajakta hanamghar
ESAKAL
'आता थांबायचं नाय', 'गोष्ट एका पैठणीची', 'बस्ता', 'धुरळा' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता हणमघर हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं. त्यात प्राजक्ताने आपल्या हटके आवाजाच्या आणि वेगवेगळ्या पात्रांच्या जोरावर प्रेक्षकांना वेड लावलंय. तिचा गावरान ठसका प्रेक्षकांना फार आवडतो. आता प्राजक्ताने एका मुलाखतीत तिच्या मुलीच्या जन्माची कथा सांगितली आहे. तिने मुलीचं नाव रावी का ठेवलं यामागचं कारण तिने सांगितलं आहे.