

iravati lagoo .jpg
esakal
कलाकार अनेकदा आपल्या भूमिकेत वाहवत गेल्याचं आपण ऐकतो. आपल्या भूमिकेसाठी कलाकार खूप मेहनत घेतात. मात्र ते नेहमीच आपल्या कामासाठी त्यांचं वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवताना दिसतात. खऱ्या आयुष्यात अनेक दुःख सहन करूनही हे कलाकार प्रेक्षकांना हसवण्याचं काम करतात. त्यांचं मनोरंजन करतात. अशाच एक मराठी अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात बरंच काही सहन केलंय. वयाच्या १८ व्या वर्षी झालेला आजार ते दोन मुलींचं निधन त्यांनी डोळ्यांनी पाहिलंय. नाटक आणि मालिकांमध्ये काम करणाऱ्या इरावती लावू यांनी नुकत्याच लोकमतला दिलेल्या मुलाखतीत त्यांचा संघर्षकाळ सांगितला आहे.