

SHUBHANGI SADARTE
ESAKAL
सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये कलाकारांच्या घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय. गेल्या काही महिन्यात काही कलाकारांनी आपण आपल्या जोडीदारापासून वेगळं होत असल्याची घोषणा केली. अशीच घोषणा एका मराठी अभिनेत्रीने देखील केली होती. मात्र आता घटस्फोटाच्या घोषणेच्या अवघ्या ३ महिन्यात तिने पुन्हा एकदा लग्न करत असल्याचं सांगत प्रेक्षकांना सुखद धक्का दिलाय. ही अभिनेत्री आहे छोट्या आणि मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली लोकप्रिय कलाकार शुभांगी सदावर्ते. शुभांगीने तिच्या केळवणाचे फोटो शेअर केलेत. ती आता दुसऱ्यांदा लग्न करत आहे.