
ENTERTAINMENT NEWS: सध्या सोशल मीडियावर कोल्हापूरच्या नांदणी मठातील हत्तीण महादेवीचा विषय प्रचंड गाजतोय. गेल्या काही दिवसात कोल्हापूरकरांनी कधीही न अनुभवलेली गोष्ट अनुभवली. साश्रू नयनांनी त्यांच्या लाडक्या महादेवी हत्तीणीला निरोप दिला. कोल्हापूरच्या शिरोळमधील नांदणी गावातील महादेवी हत्तीण गेली ३५ वर्ष त्या मठात होती. मात्र तिला नांदणी मठातून गुजरातच्या वनतारा येथे नेण्यात आलं. तिथे तिची योग्य काळी घेतली जाईल असं सांगत कोल्हापूरकरांचा विरोध झुगारून तिची पाठवणी करण्यात आली. आता याबद्दल मराठी अभिनेत्रीने राजकारण्यांना धारेवर धरलं आहे.