
लोकप्रिय नृत्यांगना हिंदवी पाटील हिच्या दुकानावर काही दिवसांपूर्वी अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली. हिंदवीचं पुणे येथील विमाननगर मध्ये हिंदवीने सह्याद्री अमृततुल्य चहाचं दुकान उघडलं होतं. मात्र कोणतीही नोटीस न देता या दुकानावर कारवाई करण्यात आली. त्यात तिच्या दुकानाचं मोठं नुकसानही झालं. या कारवाईनंतर हिंदवीने काही व्हिडिओ शेअर केले. यात ती हतबल होऊन रडताना दिसली. या कारवाईमध्ये दुकानाच्या नावाचा बोर्ड आणि सीसीटीव्हीचं मोठं नुकसान झालं असल्याचं देखील हिंदवीने व्हिडीओ शेअर करत सांगितलं. आता एका मराठी अभिनेत्रीने हिंदवीसाठी आवाज उठवला आहे.