Marathi entertainment news : दिवाळीनंतर लगीनसराई पुन्हा जोरात सुरु झालीये. मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार लग्नबंधनात अडकणार आहेत. यातच आणखी एका मराठी अभिनेत्रीने गुपचूप लग्न उरकलं. सोशल मीडियावर तिच्या विवाहसोहळ्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. .लाल इष्क, हृदयात समथिंग समथिंग या सिनेमांमुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्री स्नेहा चव्हाणने दुसरं लग्न केलं. इंस्टाग्रामवर तिने तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो शेअर केले आहे. स्नेहा चव्हाणने इंस्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी हातावर मेहेंदी काढल्याचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर तिने शेअर केलेल्या लग्नाच्या फोटोंनी सगळ्यांना धक्का बसला. अतिशय सध्या पद्धतीने तिने लग्न केलं. तिचे कुटूंबीय आणि मित्र-मैत्रिणी या लग्नसोहळ्याला उपस्थित राहिले होते. .त्या सिनेमामुळे अजयचं झालं खूप मोठं नुकसान ; "इतकं मोठं नुकसान होऊनही...", रोहितने सांगितली भावनिक आठवण.रजिस्टर पद्धतीने तिने लग्न केल्याची चर्चा आहे. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव मानस आहे. त्याच्या प्रोफेशनविषयी समजू शकलं नाहीये. स्नेहाच्या घरीच हा सोहळा पार पडला. काही दिवसांपूर्वी स्नेहाने रायडींगचे व्हिडीओ शेअर केले होते. यावेळी तिने लिहिलेल्या पोस्टमध्ये मानसचे आभार मानले होते. लग्नानिमित्त स्नेहाने सुंदर साडी आणि मानसने शेरवानी घातली होती. तर नंतर पार पडलेल्या रिसेप्शनला त्यांनी वेस्टर्न कपडे घातले होते. एक छोटीशी पार्टी त्यांच्या लग्नानिमित्त आयोजित करण्यात आली होती. स्नेहावर सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. .अनिकेत विश्वासरावबरोबर स्नेहाच पहिलं लग्न झालं होतं. पण काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिने तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. या काळात तिने मराठी सिनेमांमधून ब्रेक घेतला होता. आता दुसरं लग्न करत तिने एका नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. .अमिताभ नाही तर जंजीर स्वीकारून हे कलाकार ठरले असते बॉलिवूडचे अँग्री यंग मॅन ! नकार देण्याची कारणं वाचून व्हाल थक्क .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.