

TEJASHREE PRADHAN ON SECOND MARRIAGE
ESAKAL
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी नायिका तेजश्री प्रधान टॉप ५ अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या कामाचं सगळेच कौतुक करतात. आपल्या करिअरमध्ये तिने प्रचंड मेहनत करून हे स्थान मिळवलंय. मालिकांसोबतच चित्रपटांमध्येही तिने आपली जादू दाखवलीये. अनेक वर्ष ती इंडस्ट्रीत काम करतेय. 'अग्गबाई सासूबाई', 'प्रेमाची गोष्ट' आणि आता 'वीण दोघांतली तुटेना' अशा मालिकांमधून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सध्या ती झी मराठीवरील 'वीण दोघातली ही तुटेना' मध्ये दिसतेय. मात्र तिच्या कामाप्रमाणेच तिचं वैयक्तिक आयुष्यही कायम चर्चेत राहिलं. आता घटस्फोटाच्या ११ वर्षानंतर तेजश्री पुन्हा लग्न करण्यास तयार असल्याचं तिने सांगितलंय.