

TEJASHREE PRADHAN
ESAKAL
मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. तिने 'होणार सून मी या घरची मधून प्रेक्षकांना आपलंसं केलं. तिची ‘अग्गबाई सासूबाई’ ही मालिकादेखील चांगलीच गाजली. मात्र 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका तिने अर्ध्यातच सोडली. तेव्हा तिचे चाहते नाराज झाले होते. तिची 'वीण दोघातली ही तुटेना' ही मालिका सध्या चांगलीच गाजतेय. तिची आणि सुबोध भावेची जोडी प्रेक्षकांना आवडलीये. मात्र आता ती मालिकेतून अचानक एक्झिट घेणार आहे का असा प्रश्न अनेकांना पडलाय.