
VANASHREE PANDEY
ESAKAL
मागचा जन्म, पाप- पुण्य, कर्म यावर अनेकांचा विश्वास असतो तर अनेकांचा नसतो. ज्याला जसा अनुभव येतो तशी त्याची समज वाढत जाते. सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा याचाही अनुभव अनेकांना येत असतो. असाच अनुभव मराठी अभिनेत्री वनश्री जोशी हिला आलाय. वनश्री अभिनेत्री असण्यासोबतच एक हिलर आहे. एका गंभीर आजाराचा सामना केल्यानंतर तिला हा रास्ता मिळाला असल्याचं ती सांगते. मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या वनश्रीने स्पिरिच्युऍलिटीबद्दलचा तिचा अनुभव सांगितला आहे.