
अमिताभ बच्चन यांच्या उतरत्या करिअरला ट्रॅकवर आणणारा आणि प्रेक्षकांना करोडपती बनवणारा कार्यक्रम म्हणजे 'कौन बनेगा करोडपती'. या कार्यक्रमात अमिताभ बच्चन सगळ्यांना प्रश्न विचारतात आणि त्याची बरोबर उत्तर देणाऱ्याला थेट करोडो रुपये देण्यात येतात. गेली २५ वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. या कार्यक्रमातून आजवर मोजकेच व्यक्ती ७ कोटींची रक्कम जिंकू शकले. त्यातील एक विजेते मराठी अभिनेत्रीचे पती आहेत. त्यांनी पहिल्या सीझनमध्येच सगळ्या प्रश्नांची योग्य उत्तरं देत त्यांनी कोटींची रक्कम जिंकली होती. कोण आहे ही अभिनेत्री?