Marathi Celebrities Rangpanchami
Marathi Celebrities Rangpanchamiesakal

Rangpanchami 2025 : मराठी कलाकारांनी केली 'रंगकर्मी धुळवड २०२५' मध्ये रंगांची उधळण

Marathi Celebrities Rangpanchami Celebration : मराठी कलाकारांनी एकत्र येत रंगपंचमी साजरी केली. अमेय खोपकर, अवधूत गुप्ते आणि संजय छाब्रिया यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं.
Published on

Marathi Entertainment News : अवधूत गुप्ते, एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि अमेय खोपकर (एव्हीके पिक्चर्स) यांच्या वतीने 'रंगकर्मी धुळवड २०२५' चे आयोजन करण्यात आले होते. यात अवघी मराठी सिनेसृष्टी विविध रंगात रंगली. रंगांची उधळण, संगीत, धमाल, नृत्य, मजामस्ती या सगळ्याचा त्यांनी एकत्र येत आनंद लुटला. या वेळी सई ताम्हणकर, भरत जाधव, सुबोध भावे, प्रसाद ओक, आदिनाथ कोठारे, अभिजीत खांडकेकर, समीर चौघुले, ईशा डे, किशोरी शहाणे, राजेश मापुस्कर, रवी जाधव, हृषीकेश जोशी, सचिन गोस्वामी, सचिन मोटे, सचिन खेडेकर, सचित पाटील, संतोष जुवेकर, श्रुती मराठे, आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर, रोहित राऊत, सावनी रवींद्र, आनंदी जोशी, वनिता खरात आदी कलाकारांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी आगामी 'गुलकंद' चित्रपटातील 'चंचल' या गाण्याचे आनंदी जोशी आणि रोहित राऊत यांनी लाईव्ह सादरीकरण केले. तर कलाकार मित्रांच्या उपस्थितीत ‘येरे येरे पैसा ३’चे टिझरही लाँच करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com