
Marathi Entertainment News : सध्या सगळीकडे लगीनसराई जोरात सुरु झालीये. अनेक मराठी सेलिब्रिटीजही या काळात लग्नबंधनात अडकणार आहेत. देवमाणूस या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाडही लग्न करतोय. तू चाल पुढं फेम अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरबरोबर तो लग्न करतोय. नुकतंच सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ शेअर करत त्याने लग्नाची तारीख जाहीर केली.