थिएटरमध्ये प्रत्येक दिवशी हाउसफुल तरी थिएटर मिळेनात; मग नाट्यगृहातच लावले 'कुर्ला टू वेंगुर्ला' चित्रपटाचे शो

Kurla To Vengurla New Shows : थिएटरमध्ये प्रत्येक दिवशी हाउसफुल पण तरी थिएटर मिळेनात. त्यामुळे 'कुर्ला टू वेंगुर्ला' या चित्रपटाच्या टीमने नाट्यगृहात या चित्रपटाचे शो लावलेत.
kurla to vengurla

kurla to vengurla

esakal

Updated on

माती आणि नाती जोडणारा सिनेमा असे ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे, तो "कुर्ला टू वेंगुर्ला" हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. स्पंदन परिवार या लोकचळवळीतून निर्माण झालेल्या या सिनेमाने रसिक प्रेक्षक, मान्यवर आणि समीक्षक अशा तिघांची प्रचंड पसंती मिळवली. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर 'कुर्ला टू वेंगुर्ला हा खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा सिनेमा आहे' तर ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांनी 'कुर्ला टू वेंगुर्ला म्हणजे कलेच्या बजबजपुरीत वाजणारं खणखणीत नाणं आहे' असे विधान केले. सर्वजण सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल भरभरून लिहू लागले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com