प्रेक्षकांना मोहिनी घालायला येतेय तुंबाडची मंजुळा ! सोशल मीडियावर पोस्टर रिलीज

Marathi New Movie Tumbadachi Manjula Poster Out : तुंबाडची मंजुळा नावाचा नवीन सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे.
Marathi New Movie Tumbadachi Manjula Poster Out

Marathi New Movie Tumbadachi Manjula Poster Out

esakal

Updated on

Marathi Entertainment News : कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो निसर्गरम्य परिसर, नयनरम्य समुद्रकिनारा आणि याचभोवतीने फिरणाऱ्या किती तरी गूढ अशा रहस्यमय कथा आणि सोबतीला गावाकडच्या गजाली. भुता - खेतांवरील चर्चा हा गावाकडच्या माणसांचा कायमच मनोरंजनाचा विषय राहिलेला आहे. यातच वीतभर घडलेल्या गोष्टी हातभर लांब करून सांगणे हा जणू अनेकांचा आवडता छंदच. अशाच काहीशा गूढ वातावरणातली आणि कोकणाच्या परंपरेला साजेशी एक अतिशय रंजक गोष्ट झी स्टुडिओजने आपल्या प्रेक्षकांसाठी आणली आहे. ' तुंबाडची मंजुळा ' असे या चित्रपटाचं नाव असून होळीच्या दिवशी सोशल मीडियावरून या चित्रपटाचं आगळं वेगळं मोशन पोस्टर प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com