

UUT MOVIE
ESAKAL
समाजातील दाहक वास्तवावर प्रकाशझोत टाकणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षकांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे. अशाच एका जिद्दी युवकाच्या संघर्षाचा वेध घेणाऱ्या 'ऊत' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच नुकताच मोठ्या दिमाखात संपन्न झाला वेरा फिल्म्स निर्मित आणि राम मलिक लिखित-दिग्दर्शित 'ऊत' चित्रपटात संघर्ष कथेसोबतच एक प्रेमकथाही पहायला मिळणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल, असा विश्वास निर्माता अभिनेता राज मिसाळ यांनी यावेळी व्यक्त केला.