%20(7).jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
%20(7).jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
New Marathi Serial Updates: मराठीतील विविध वाहिन्यांच्या गर्दीत नवनवीन मालिकांची एन्ट्री होताना दिसतेय. नवा विषय आणि नव्या कथा हा आकर्षणाचा विषय ठरतय. यातच दुर्गा या नव्या मालिकेची सर्त्र चर्चा आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील या मालिकेच्या प्रोमोनेच प्रेक्षकांमध्ये उत्कंठा निर्माण केली आहे. एकिकेड टेलिव्हीजन विश्वातील लोकप्रिय चेहरे या मालिकेत झळकतायत तर दुसरीकडे रुमानी खरे हा नवा वचेहरा या मालिकेतून मालिकाविश्वात पदार्पण करतोय. मात्र मालिकेतील नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओने सगळ्यांच लक्ष वेधलय. या व्हिडीओत चक्क प्रसिद्ध राजकीय नेत्या पाहायला मिळत आहेत.