

marathi serial trp
ESAKAL
छोट्या पडद्यावरील मालिकांचं भवितव्य हे टीआरपीवर अवलंबून असतं. त्यामुळे टीआरपीमध्ये अव्वल राहण्यासाठी जोरदार स्पर्धा असते. यात स्टार प्रवाह आणि झी मराठी वाहिनी या दोन्ही वाहिन्यांवरील मालिका या प्रेक्षकांच्या आवडत्या आहेत. गेली ३ वर्ष स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' ही मालिका टीआरपीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या आठवड्यातही ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र आतापर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असलेली मालिका आता थेट दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.