

ROHIT RAUT
ESAKAL
गेले सहा आठवडे अॅमेझॉन एमक्स प्लेयरवरील 'आय- पॉपस्टार' या नव्या धाटणीच्या कार्यक्रमाने तरुणाईला वेड लावलं होतं. भारतातील म्युझिक रिअलिटी शोजमधे नवा मापदंड प्रस्थापित करणाऱ्या या शो ची सांगता एका दिमाखदार अंतिम फेरीसह करण्यात आली. या शोला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. मराठमोळा रोहित राऊत या शोचा पहिला विजेता ठरलाय. त्याने सगळ्यांना मागे टाकत 'आय पॉपस्टार'च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय.