

marathi actress loves sachin tendulkar
esakal
क्रिकेटचा देव म्हणवल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचे आजही करोडो चाहते आहेत. आजही कित्येक तरुणी त्याच्या प्रेमात वेड्या आहेत. त्याच्या खेळण्याची स्टाइल, त्याचं बोलणं सगळंच चाहत्यांच्या मनात घर करून आहे. त्याच्या दिसण्यावर तर आजही तरुणी फिदा आहेत. त्याचा फिटनेस वाखाणण्याजोगा आहे. त्याकाळी अनेकांनी आपल्या घरात सचिनचे पोस्टर लावलेले. मात्र तुम्हाला माहितीये का एका मराठी सुपरस्टारची पत्नीही सचिनच्या प्रेमात होती. तिला सचिन खूप आवडायचा. ती अगदी त्याच्याशी लग्नही करायला तयार होती. मात्र अभिनेत्यामुळे ते शक्य झालं नाही.