
लोकप्रिय मराठी अभिनेता रितेश देशमुख याच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. रितेशच्या महत्वकांक्षी प्रोजेक्ट पैकी एक असलेला हा चित्रपट आहे. रितेशने अनेक बॉलिवूड चित्रपटात त्याच्या अभिनयाची छाप पाडलीये. नुकताच त्याचा 'रेड २' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याने नकारात्मक भूमिका साकारली आहे. त्यानंतर त्याने 'राजा शिवाजी' या चित्रपटाचं नवं मोशन पोस्टर रिलीज केलंय. या पोस्टरसोबत चित्रपटातील कलाकारांची नावं देखील आहेत. अशातच आता एका टीव्ही अभिनेत्याची या चित्रपटात एंट्री झाली आहे.