
Marathi Entertainment News : तीन अतरंगी मित्रांची भन्नाट कहाणी सांगणाऱ्या ‘आंबट शौकीन’चा धमाल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरमध्ये ललित, वरूण आणि रेड्डी हे तीन खट्याळ मित्र दिसत असून ते हसवण्यासोबत विचार करायलाही भाग पाडत आहेत. प्रेम, मैत्री, सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत हरवलेली ओळख व मानसिक गुंतागुंत हे सगळे या चित्रपटात मांडण्यात आले आहे. या तिघांच्या आंबटपणामुळे त्यांच्या आयुष्यात काय वादळ येणार, हे पाहाणे रंजक ठरणार आहे.