डोळ्यात संताप अन् लेकरासाठीची तगमग; प्रार्थना बेहेरेच्या 'मर्दिनी'चा टीझर प्रदर्शित; दिसणार अभिनेत्रीचा दमदार अंदाज

PRARTHANA BEHERE MARDINI MOVIE: लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिच्या 'मर्दिनी' या चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित झालाय. यात प्रार्थना वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळतेय.
prarthana behere

prarthana behere

ESAKAL

Updated on

सध्या मराठी सिनेसृष्टीत आशय, भावना आणि वास्तववादी कथानकांवर भर दिला जातोय. नवनवीन, अंतर्मुख करणाऱ्या आणि भावनिक स्तरावर भिडणाऱ्या कथा प्रेक्षकांच्या भेटीला येतायत. मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिचा 'मर्दिनी' हा चित्रपटदेखील अशाच एका वेगळ्या कथनकावर आधारलेला आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झालाय. मुख्य म्हणजे प्रार्थना देखील या चित्रपटात एका वेगळ्या आणि दमदार भूमिकेत दिसतेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com