हॉलीवूडमधील दिग्गज मार्टिन स्कॉर्सेसे हे करण जौहरच्या धर्मा प्रोडक्शन निर्मित 'होमबाउंड' चित्रपटाचे कार्यकारी निर्माता म्हणून असणार आहे. या चित्रपटातून मार्टिन यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर, ईशान खट्टर आणि विशाल जेठवा मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट 2025 च्या 'कान' फिल्म फेस्टिवलमध्ये सर्टेन रिगार्ड सेक्शनसह प्रदर्शित होणार आहे.