

Marathi Entertainment News : कधी कधी एखादं चित्रच खूप काही सांगून जातं… शब्दांशिवाय भावना व्यक्त करतं… आणि 'माया' या आगामी मराठी चित्रपटाचं मोशन पोस्टर मधून नेमकं हेच दिसतं. नातेसंबंधांवर भाष्य करणारा ‘माया’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, पहिल्याच नजरेत ते मनाला स्पर्श करून जातं. हे पोस्टर केवळ चित्रपटाची झलक देत नाही, तर नात्यांमधील जिव्हाळा, तडे, अंतर आणि स्वीकार यांचा अर्थपूर्ण संवाद घडवून आणत आहे.