

Maya Movie Teaser Out
esakal
Marathi Entertainment News : नात्यांच्या गुंतागुंतीकडे हळुवारपणे पाहाणाऱ्या आणि माणसाच्या अंतर्मनातील हालचाली टिपणाऱ्या कथा दिग्दर्शक आदित्य इंगळे यांच्या चित्रपटांची खास ओळख आहे. ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ आणि ‘बिन लग्नाची गोष्ट’सारख्या चित्रपटांतून नात्यांवर संवेदनशील भाष्य करणाऱ्या आदित्य इंगळे यांचा ‘माया’ हा नवा चित्रपट आता त्याच भावविश्वाचा पुढचा टप्पा ठरत असल्याचं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमधून दिसून येतं. या टीझरमुळे या चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे.