

MAYASABHA
ESAKAL
'तुंबाड' सारख्या कल्ट क्लासिक चित्रपटाचे दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांच्या दुसऱ्या चित्रपटाचा, 'मयसभा' चा फर्स्ट मोशन टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा बहुप्रतीक्षित चित्रपट १६ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. भारतीय चित्रपट क्षेत्रात लवकरच एक नवीन अध्याय उलगडणार असून, जवळजवळ एक दशकाच्या प्रदीर्घ प्रयोग, विकास आणि पुनर्निर्माणानंतर दिग्दर्शक बर्वे आता पुन्हा परतत आहेत. या चित्रपटात एक मराठी अभिनेत्रीदेखील झळकणार आहे.