
Marathi Movie : लहान मुलांचे भावविश्व वेगळे असते. त्यांना बालवयात निरनिराळे प्रश्न पडत असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरे ते कधी आपल्या पालकांकडून तर कधी स्वतःहून आपल्या परीने मिळविण्याचा प्रयत्न करीत असतात. 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटामध्ये अशाच एका निरागस व भाबड्या मुलीची कथा मांडण्यात आली आहे.