
mayuri waghon piyush ranade
esakal
आजही एखाद्या जोडप्याने घटस्फोट घेतला तर त्यांच्याकडे आश्चर्याच्या नजरेने पाहिलं जातं. मात्र त्यामागे तशीच काही कारणं असतात. गेल्या काही वर्षात अनेक मराठी कलाकारांनीदेखील आपल्या घटस्फोटाची घोषणा केली. काही त्याबद्दल उघडपणे बोलताना दिसतात. आता 'अस्मिता' फेम मयुरी वाघ हिनेदेखील तिच्या घटस्फोटाबद्दल मौन सोडलंय. त्यांच्या लग्नात नेमकं काय बिनसलं याबद्दल तिने सांगितलंय. पियुष रानडे तिच्याशी कसा वागायचा याबद्दलही मोकळेपणाने बोललीये. आपली फसवणूक झाली, मारलं गेलं असे अनेक गंभीर आरोप तिने पीयूषवर केलेत.