

sansar maza rekhite
esakal
महिलांवरील अत्याचार, शोषण आणि लैंगिक छळाच्या घटना आजही समाजासमोर गंभीर प्रश्न निर्माण करत आहेत. निर्भया प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा देशभरात चर्चेत आला. मात्र, इतक्या वर्षांनंतरही अशा घटनांना पूर्णविराम मिळालेला नाही. पीडित महिलांना न्याय मिळवून देणं आणि अन्यायाविरोधात लढण्यासाठी त्यांना बळ देणं ही आजच्या काळाची गरज आहे. हाच संवेदनशील विषय सन मराठीवरील 'मी संसार माझा रेखिते' या मालिकेतून मांडण्यात येत आहे.