Premier
Zee Marathi Serial : बिग बॉस मराठी विजेती मेघा धाडेचा मालिकेत दणक्यात कमबॅक ; 'या' मालिकेत करणार काम
Megha Dhade comeback in marathi serial : अभिनेत्री आणि बिग बॉस मराठी सीजन 1 ची विजेती मेघा धाडे मालिकाविश्वात कमबॅक करतेय. जाणून घेऊया तिच्या भूमिकेविषयी आणि नव्या मालिकेविषयी.
Marathi Entertainment News : सध्या मराठी मालिकाविश्वात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. काही दिवसांपूर्वीच सावळ्याची जणू सावली या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला. सोशल मीडियाला हा प्रोमो चर्चेत असतानाच या मालिकेच्या आणखी एका प्रोमोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि आश्चर्याचा धक्काही दिला. अभिनेत्री आणि बिग बॉस मराठी एक ची विजेती मेघा धाडे या मालिकेतून मालिकाविश्वात कमबॅक करतेय.

