दुसऱ्या बरोबर झोपलीये, आपल्याबरोबर का नाही येत... मेघा घाडगेने सांगितला तो धक्कादायक प्रसंग, म्हणाली,'तो दारू पिऊन तऱ्हाट...'

MEGHA GHADGE SHOCKING INCIDENT:मराठमोळी अभिनेत्री आणि लावणी कलावंत मेघ घाडगे हिने तिच्यासोबत घडलेल्या एका अशा प्रसंगाबद्दल सांगितलं जो ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला.
MEGHA GHADGE

MEGHA GHADGE

ESAKAL

Updated on

'रूपानं देखणी, सुपारी चिकनी' हे गाणं जर कुणा अभिनेत्रीमुळे घराघरात लोकप्रिय ठरलं असेल तर ती म्हणजे मेघा घाडगे. तिच्या या गाण्यातील अदा आणि सादरीकरण अप्रतिम होतं. त्यामुळे मेघा यांना चित्रपटसृष्टीतील वाटा मोकळ्या झाल्या. मेघा उत्तम लावणी नृत्यांगना आहेत. मात्र त्यामुळेच त्यांना अनेक वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागलं. चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी आपल्याला कॉम्प्रोमाइज करायला सांगण्यात आलं. मात्र आपण नकार दिल्यावर त्यांनी आपली बदनामी केली. झीच्या पार्टीत तर एका कलाकाराने केस पकडून त्यांना शिव्या दिल्या होत्या हे देखील त्यांनी या मुलाखतीत सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com