Miley Cyrus Wedding : पहिल्या लग्नाच्या ८ महिन्यांतच झाला होता घटस्फोट; आता मायली सायरस दुसऱ्यांदा अडकणार विवाहबंधनात!

संगीतकार मॅक्स मॉरँडोसोबत दक्षिण कॅलिफोर्नियात खासगी विवाहसोहळ्याची चर्चा; गेल्या वर्षी दोघांचा साखरपुडा झाला होता.
Miley Cyrus is reportedly set to marry fiancé Maxx Morando in Southern California this weekend, nearly seven years after her separation from Liam Hemsworth.

Miley Cyrus is reportedly set to marry fiancé Maxx Morando in Southern California this weekend, nearly seven years after her separation from Liam Hemsworth.

Sakal

Updated on: 

हॉलिवूडची लोकप्रिय पॉप गायिका मायली सायरस पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेता लियाम हेम्सवर्थ सोबतचे पहिले लग्न फार काळ टिकले नव्हते. आता जवळपास सात वर्षांनंतर मायली पुन्हा लग्नाच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. संगीतकार आणि तिचा होणारा जोडीदार मॅक्स मॉरँडो याच्यासोबत ती याच वीकेंडला विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये हा विवाहसोहळा पार पडू शकतो. परंतु, मायली किंवा मॅक्स यांच्याकडून अद्याप या विषयी अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

Loading content, please wait...