Milind Gawali: "आजारी होती, खूप शारीरिक वेदना व्हायच्या पण..."; आईच्या आठवणीत मिलिंद गवळी भावूक, शेअर केला व्हिडीओ

Milind Gawali: मिलिंद गवळी यांनी मातृदिनानिमित्त खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
"आजारी होती, खूप शारीरिक वेदना व्हायच्या पण..."; आईच्या आठवणीत मिलिंद गवळी भावूक, शेअर केला व्हिडीओ
Milind Gawalisakal

Milind Gawali: आज मातृदिनानिमित्त अनेक सेलिब्रिटी त्यांच्या आईसाठी खास पोस्ट शेअर करत आहेत. अशातच नुकताच आई कुठे काय करते फेम मिलिंद गवळी यांनी मातृदिनानिमित्त खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

आईच्या आठवणीत मिलिंद गवळी भावूक

मिलिंद गवळी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते आईच्या आठवणीत भावूक झालेले दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मिलिंद गवळी हे आईबद्दल असणाऱ्या त्यांच्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. या व्हिडीओला मिलिंद गवळी यांनी कॅप्शन दिलं, "मातृदिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा,खरंतर मातृदिन हा एक दिवस असू शकत नाही, वर्षातले 365 दिवस मातृदिन च असायला हवा, खरंच आपण आईला किती taken for granted, गृहीत धरत असतो, आपल्याला नऊ महिने पोटात सांभाळून, असंख्य वेदना सहन करून, आपल्याला जन्म देते, आणि आपल्याला जन्म दिल्यानंतर आयुष्यभर निस्वार्थीपणे आपला सांभाळ करते, आपली काळजी घेते, हवंनको ते सगळं बघते, आपल्याला बोलायला,चालायला, धावायला शिकवते, पहिली priority तिच्यासाठी आपण असतो, ती स्वतःची कधी काळजी घेतच नाही, सतत आपली काळजी करत राहते, माझी आई तर मी बाहेरून आल्या आल्या माझा चेहरा बघून ती सांगू शकायची आजचा माझा दिवस कसा गेला असेल ते, आणि मला नेहमीच आश्चर्य वाटायचं, की तिला कसं कळतं, एक दिवस मी घरी आलो आणि माझ्या चेहऱ्यावरन तिने ओळखलं की काहीतरी गडबड झाली आहे, ती मला सारखं विचारे “काय झालं बाळा काहीतरी झालं आहे, तू माझ्यापासून लपवतोयस “, आणि खरंच मी तिच्यापासून लपवत होतो की त्या दिवशी मी ज्या रिक्षात न जात होतो ती रिक्षा पलटली होती आणि माझ्या पायाला लागलं होतं."

पाहा व्हिडीओ:

"आजारी होती, खूप शारीरिक वेदना व्हायच्या पण..."; आईच्या आठवणीत मिलिंद गवळी भावूक, शेअर केला व्हिडीओ
Milind Gawali: "मला आमंत्रण दिलं नाही कारण...", अयोध्या राम मंदिर सोहळ्याबद्दल अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

"आईचा मुलांमध्ये जीव अडकलेला असतो ते काय खोटं नाही आहे, माझी आई तर माझी काळजी करत करतच गेली, स्वतःची काळजी तिने कधी घेतलीच नाही, तिने तिचा आनंद जगाबरोबर साजरा केला पण तिचं दुःख मात्र तिने तिच्याजवळच कायम ठेवलं, आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीची तक्रार तिने कधी केली नाही, तिने तिचं जगणं नेहमी celebrate च
केलं.", असंही त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

पुढे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, "माझी आई असेपर्यंत मी राजासारखाच जगलो, तीने मला प्रामाणिकपणे कष्ट करायला शिकवलं, ती स्वतः खूप मोठी मोठी स्वप्न पाहायची, तिने मलाही मोठी स्वप्न बघायला शिकवलं, आपल्याकडे कष्ट करायची जिद्द असेल आणि परमेश्वरावर श्रद्धा असेल तर जगामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही असं असं ती नेहमी सांगत असे, तिला राग द्वेष हे काय माहिती नव्हतं तिला फक्त असीम प्रेम करणं निस्वार्थ प्रेम करणं हेच ठाऊक होतं, आणि आणि प्रेम करण्यामध्ये कधी भेदभाव नव्हता, गरीब श्रीमंतीचा भेदभाव नव्हता लहान-मोठ्याचा भेद भाव नव्हता, गणेशपुरीच्या नित्यानंद बाबांवर मुक्तानंद बाबांवर आणि गुरुमांईवर अपार श्रद्धा होती, शेवटच्या क्षणापर्यंत ती त्यांचा जप करत होती, आजारी होती खूप शारीरिक वेदना व्हायच्या पण म्हणायची मला कसली भीती च नाहीये मला मोक्षच मिळणार.मला अजूनही असं वाटतं की ती शरीराने आपल्यात नाहीये पण मनाने ती सतत,माझ्या जवळच असते. मातृदिनाच्या निमित्ताने एवढेच सांगावस वाटतं, आपल्या आईला जपा, तिला आनंदी ठेवा, खूप प्रेम करा तिच्यावर."

"आजारी होती, खूप शारीरिक वेदना व्हायच्या पण..."; आईच्या आठवणीत मिलिंद गवळी भावूक, शेअर केला व्हिडीओ
Milind Gawali: "आई बापाच्या जीवावर मजा करणाऱ्या मुलांपेक्षा...", मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com