
milind gawali
esakal
'आई कुठे काय करते' मधून घराघरात पोहोचलेले लोकप्रिय मराठी अभिनेते मिलिंद गवळी नेहमीच आपल्या तब्येतीची काळजी घेताना दिसतात. या मालिकेने त्यांना नवीन ओळख मिळवून दिली. मालिका बंद झाली असली तरी मिलिंद यांची लोकप्रियता मुळीच कमी झालेली नाही. मिलिंद हे नेहमीच त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत आले आहेत मात्र एकदा त्यांनाही हृदयविकाराचा त्रास झाला होता. हा प्रसंग त्यांच्या लेकीनेच एका मुलाखतीत सांगितला आहे. हे सांगताना तीदेखील भावुक झाली होती.