Mirzapur 3: 'मिर्झापूर'ला मुन्नाभैय्याचा रामराम; दिव्येंदुने सांगितलं वेब सीरिज सोडण्यामागचं कारण

Mirzapur 3: 'मिर्झापूर' या वेबसिरीजमध्ये मुन्नाभैयाची भूमिका साकारणारा अभिनेता दिव्येंदु यापुढे ही भूमिका साकारणार नसल्याचा खुलासा त्याने एका मुलाखतीत केला.
Mirzapur 3
Mirzapur 3esakal

Mirzapur: आजवर सगळ्यात जास्त गाजलेल्या वेबसिरीजमधील एक वेबसिरीज म्हणजे मिर्झापूर (Mirzapur). क्राईम-थ्रिलर या विषयावर बेतलेल्या या वेबसिरीजचे दोन्ही सीजन खूप गाजले. कालीन भैय्याचं गुन्हेगारी जग आणि त्यात सुरु असलेली सत्तेची चढाओढ यावर ही वेबसिरीज आधारलेली होती. या वेबसीरिजचे आतापर्यंतचे दोन्ही सीजन खूप गाजले आणि आता लवकरच तिसरा सीजन येणार असल्याची चर्चा आहे.

दिव्येंदु मिर्झापूर-3 मध्ये काम न करण्याचं कारण काय?

मिर्झापूरच्या चाहत्यांसाठी मात्र निराशाजनक बातमी आहे. या वेबसिरीजमध्ये मुन्नाभैयाची भूमिका साकारणारा अभिनेता दिव्येंदु यापुढे ही भूमिका साकारणार नसल्याचा खुलासा त्याने एका मुलाखतीत केला. ह्यूमन्स ऑफ बॉम्बे या सोशल मीडिया पेजला दिलेल्या मुलाखतीत त्याने ही गोष्ट उघड केली. या भूमिकेने त्याच्या व्यक्तिमत्त्वावर खोलवर परिणाम केलाय. त्याचे काही वाईट अनुभवही त्याला आले आहेत. त्या भूमिकेचा खूप वाईट परिणाम त्याच्यावर झाला आहे. "कधी कधी तुम्ही त्या भूमिकेतच शिरलेले राहता आणि ते खूप वाईट असतं." असं तो या मुलाखतीत म्हणाला आणि म्हणूनच, त्याने या वेबसिरीजच्या तिसऱ्या भागात काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयाने त्याचे चाहते निराश झाले आहेत.

दिव्येंदु नुकताच मडगाव एक्स्प्रेस या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आला. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळालं.

Mirzapur 3
Mirzapur : मिर्झापूरच्या मेकर्सनं दिली आनंदाची बातमी, 'आता...'

'मिर्झापूर'ला मिळाली प्रेक्षकांची पसंती

राजकीय क्राईम थ्रिलर असलेल्या मिर्झापूर या सिरीज मध्ये दिव्येंदुने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. २०१८ मध्ये या वेबसिरीजचा पहिला सीजन प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि २०२० मध्ये आलेल्या दुसऱ्या सीजननेही प्रेक्षकांची मनं जिंकली. २०२२ मध्ये वेबसीरिजच्या निर्मात्यांनी सीजन ३चं शूटिंग सुरु झाल्याची घोषणा केली होती आणि या वेब सीरिजचं काम शेवटच्या टप्प्यात आल्याचं म्हंटलं जातंय. तिसऱ्या सीजनमध्ये अली फझल, पंकज त्रिपाठी, रसिका दुग्गल आणि श्वेता त्रिपाठी शर्मा हे कलाकार दिसणार आहेत. लवकरच ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येतेय.

Mirzapur 3
Amazon Prime Video: 'मिर्झापूर' आणि 'पंचायत'चा नवा सीझन येणार प्रेक्षकांच्या भेटीला; प्राइम व्हिडीओने केली आगामी चित्रपट आणि वेब सीरिजची घोषणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com