
LATA MANGESHKAR
ESAKAL
मोहम्मद रफी, आशा भोसले आणि लता मंगेशकर... भारतीय संगीत जगतात या नावांनी इतिहास घडवला. हे तिन्ही गायक आपापल्या जागी महान होते, पण फार कमी लोकांना माहीत असेल की मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्यात अजिबात पटत नव्हते. एवढेच नाही तर, मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्यातही वाद झाले होते. खुद्द मोहम्मद रफी यांचा मुलगा शाहीद रफी यांनी एका मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला आहे. शाहीद रफी यांनी आशा भोसले आणि लता मंगेशकर यांच्यावर त्यांच्या वडिलांचे करिअर उद्ध्वस्त केल्याचा आरोपही केला आहे.