
mohanlal
esakal
भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल मल्याळम चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते मोहनलाल यांना प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. नुकतीच भारत सरकारने ही घोषणा केली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, "दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीच्या शिफारशीनुसार, भारत सरकारतर्फे मोहनलाल यांना २०२३ चा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मोहनलाल यांच्या अतुलनीय अभिनय प्रवासाबद्दल त्यांचा गौरव करण्यात येत आहे. ते उत्कृष्ट अभिनेत्यासोबतच उत्तम दिग्दर्शक आणि निर्मातेदेखील आहेत.