
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' ने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलंय. ही मालिका सुरुवातीपासूनच टीआरपी यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. मालिकेतील सायली आणि अर्जुन प्रेक्षकांचे अत्यंत लाडके आहेत. काही दिवसांपूर्वीच या मालिकेतील अर्जुनाची बहीण अस्मिता म्हणजेच अभिनेत्री मोनिका दबडे हीचं डोहाळे जेवण पार पडलं होतं. आता दुसऱ्यांदा तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडलाय. तिने त्यांचे खास फ़ोटोही शेअर केलेत.