२१व्या वर्षीचा तो क्षण विसरणं अशक्य! अभिज्ञा भावेंनी सांगितली आईच्या प्रेमाची हृदयस्पर्शी कहाणी

२१व्या वर्षीचा तो क्षण विसरणं अशक्य! अभिज्ञा भावेंनी सांगितली आईच्या प्रेमाची हृदयस्पर्शी कहाणी

आई फक्त एक व्यक्ती नाही तर एक भावना आहे, तीच कुटुंबाला जोडणारा दुवा आहे; 'तारिणी' मालिकेतील कौशिकीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने आईच्या संस्कारांचे आणि प्रेरणेचे महत्त्व केले स्पष्ट.
Published on

अभिज्ञा भावे - अभिनेत्री

आई ही सर्वांसाठीच महत्त्वाची असते; पण त्याचबरोबर आई हा एक संग्रह असतो,  लहानपणीच्या आठवणींचा, आपण विसरलेल्या गोष्टींचा, आणि आपल्या सवयींच्या मागचं खरं कारण समजून घेणाऱ्या भावनांचा. आपल्याला काही येत नसेल तर आपण चटकन ‘आई हे कसं करायचं?’, असं आईला विचारतो. आपल्या काही सवयींचं आपण स्वतःही समर्थन करू शकत नाही; पण आई त्या खूप सुंदरपणे स्पष्ट करते, कारण ती आपल्याला लहानपणापासून बघत आलेली असते. आपल्या मुलांच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही गुणांबद्दल आईला सखोल माहिती असते. मला असं वाटतं, की आपल्या स्वतःला स्वतःपेक्षा जास्त समजणारी जर कोणी असेल, तर ती म्हणजे आई.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com