Mrinal KulkarniEsakal
Premier
"आता व्यक्त होण्याची ताकद नाही", मृणाल कुलकर्णी यांना मातृशोक ;मराठी साहित्यविश्वालाही बसला धक्का
Mrinal Kulkarni Mother Passed Away : अभिनेत्री दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांची आई वीणा देव यांचे निधन झालं. सोशल मीडियावर मृणाल यांनी पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
Marathi News : अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या आई आणि ज्येष्ठ लेखिका वीणा देव यांचं काल मंगळवारी 29 ऑक्टोबरला निधन झालं. गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या. निधनासमयी त्यांचं वय 75 होतं. विणा या मराठीतील सुप्रसिद्ध लेखक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या होत्या.