

MRINAL KULKARNI
ESAKAL
'सोनपरी' बनून चिमुकल्यांसोबतच मोठ्या माणसांच्या हृदयात स्थान निर्माण करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री मृणाल कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यांचं सौंदर्य आजही अनेकांना भुरळ पडेल असं आहे. लवकरच त्या 'बंडखोर' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सिनेमात त्यांच्यासोबत छाया कदम, प्रियदर्शनी इंदलकर, तितिक्षा तावडे, पूजा कातुर्डे, नित्यश्री ज्ञानलक्ष्मी हे कलाकार आहेत. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या डोहाळे जेवणादरम्यान घडलेली गोष्ट सांगितलीये. ज्याची त्यांना आजवर खंत वाटते.