
mrunmayi deshpande
ESAKAL
लोकप्रिय मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने 'कुंकू' मालिकेतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. तिने प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडलं. त्यानंतर मृण्मयी अनेक चित्रपटात झळकली. तिची 'चंद्रमुखी' मधली भूमिकादेखील चांगलीच गाजली. मृण्मयी सध्या तिचा पती स्वप्नील राव याच्यासोबत महाबळेश्वर येथे त्यांच्या फार्महाउसवर राहते. ते दोघे तिथे शेतीही करतात. मृण्मयी आणि स्वप्नील यांचं अरेंजमरेज आहे. मात्र जेव्हा मृण्मयी मॅट्रोमोनी साइटवरच्या मुलांना भेटायला गेलेली तेव्हा काही गमतीशीर किस्से घडले होते. हे किस्से तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.