
MRUNAL DUSANIS
ESAKAL
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानिस आजही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकतेय. तिने ‘तू तिथे मी’, ‘असं सासर सुरेख बाई’, ‘हे मनं बावरे’ या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तिने साकारलेली प्रत्येक भूमिका छोट्या पडद्यावर हिट ठरली. तिचा स्वतःचा असा वेगळा चाहतावर्ग आहे. मात्र मृणाल गेले काही वर्ष छोट्या पडद्यापासून लांब होती. ती तिचा पती नीरजसोबत परदेशात होती. मात्र त्यांच्या लग्नाची गोष्ट अगदीच खास होती. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने त्याच्या लग्नाआधीचा किस्सा सांगितला आहे.