

mrunal jadhav on bajrangi bhaijan
esakal
सध्या अजय देवगन याच्या 'दृश्यम' चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या फ्रॅन्चायजीचा तिसरा भाग २ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि त्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. या चित्रपटातील कलाकारदेखील प्रेक्षकांच्या आवडत्या कलाकारांच्या यादीत आहेत. विशेषतः साळगावकर कुटुंब. यात अजयच्या लहान मुलीची भूमिका म्हणजेच अनुची भूमिका एका मराठी बालकलाकाराने साकारली आहे. तिचं नाव आहे मृणाल जाधव. मृणालने आजवर 'लय भारी', 'तू ही रे' सारख्या अनेक चित्रपटात भूमिका केलीये. मात्र हीच मराठमोळी मृणाल सलमान खान सोबत 'बजरंगी भाईजान' चित्रपटातही दिसली असती. मात्र एका कारणामुळे तिची ही संधी हुकली.