
mrunamye deshpande
esakal
'कुंकू' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. मृण्मयीने मुंबई पुण्यापासून दूर महाबळेश्वर येथे स्वतःचं टुमदार घर बांधलं. काम संपलं की ती आणि तिचा पती तिथेच राहतात. ते तिथे शेती करतात. मुलाखतींमध्ये तिने आपण इतक्या लांब घर बांधलं हे तिने सांगितलं होतं. आता मृण्मयीची आणखी एक मुलाखत चर्चेत आहे. ज्यात ती एकत्र कुटुंब पद्धतीबद्दल बोलली आहे. नवरा आणि बायको अशा दोघांनीच मिळून मुलांना वाढवणं किती अवघड आहे यावर भाष्य केलंय.